Wednesday, February 22, 2006

बदल

कालच गप्पांचा विषय माणसांच्या बदलणाऱ्र्या किंवा न बदलणाऱ्र्या स्वभावांबद्दल निघाला होता.
निखिल म्हणाला 'ज्ञानेश्वरी', 'दासबोध' किंवा तत्सम सद्वर्तनाचा रस्ता दाखवणारे दीपस्तंभ असलेले ग्रंथ भरपूर असूनसुद्धा माणूस का बदलत नाही ते वाचले तरीसुद्धा एकदम चांगला का वागू लागत नाही ?
प्रश्न तर अगदी बरोबर आहे पण उत्तर आपण जाणतोच कि फार फार अवघड आहे.
बोलता बोलता सहज मला एक साम्यदर्शक कल्पना सुचली आणि मी ती निखिलला बोलून दाखवली.
तशी ती फार सरधोपट गणिती कल्पना होती जी मी सोपी करुन इथे सांगतो.
एक मध्य मार्ग आहे ज्याने गेल्यास संताच्या चांगल्या रस्त्याचे अनुकरण होइल असे गृहित धरुयात.
ह्या रस्त्याच्या एका बाजूला वाईट लोकांचा भाग आहे आणि त्यांच्या वाटा आहेत आणि दुसऱ्र्या बाजूला अगदी दुबळ्या लोकांचा भाग आहे जे दुसऱ्याने मदत केली नाही तर काहिच करत नाहीत किंवा त्यांची इतकी क्षमता नाही कि ते स्वत:हून काहितरी करतील.
आता हे ग्रंथ किंवा विचार दोन्हीबाजूचे लोक वाचतात असं गृहित धरुयात.
माझं म्हणणं असं आहे कि दोन्ही बाजूचे लोक बदलतात फक्त शक्य तितकं त्या मधल्या रस्त्याच्या जवळ येतात इतकच.
जितकं त्याचं त्या रस्त्यापासून डेव्हिएशन कमी तितका त्यांचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव चांगुलपणाकडे वळणार/बदलणार.
तेव्हा मी हे मानणारा आहे कि असं जे काहि साहित्य किंवा मार्गदर्शनपर उपदेश आहेत त्याचा आपल्या प्रत्येकावर थोडासा चांगला परिणाम नक्कीच होतो.
अर्थात झोपेचं सोंग घेतलेल्याला कशाचीच भीति बाळगायचं कारण नाही कारण हे सर्व काहि जे मी वर म्हणालो ते त्यांना लागू पडायचा प्रश्नच उद्भवत नाही.
हे सगळं ज्यांना मनापासून काहि बदल हवा आहे त्यांनाच लागू पडतं.

2 Comments:

Blogger Shailesh S. Khandekar said...

सुरेख लेख!

2:24 AM  
Blogger Mugdha said...

Hey nice thought!!! Its a very nice way to put in a complicated issue in simplistic terms.. Also your other blogs are mindblowing!!!!

6:59 AM  

Post a Comment

<< Home