Tuesday, January 10, 2006

भाग्यविधाता

भाग्यविधाता हा खरंतर फ़ार मोठा शब्द. त्याचा अर्थ जो आपलं सर्वसामान्य लोकांच भाग्य आणि अस्तित्व ठरवतो आणि त्याच्या मर्जीनुसार आपला खेळ चालतो तो.
बहुतेक वेळा त्याला 'देव' असं म्हणलं जातं. क्वचित कधीतरी शताकानुशतकांतुन एखादा माणूस हे विशेषण धारण करण्याजोगा जन्मतो.
पण आजकाल गल्लोगल्ली असे नवे भाग्यविधाते जन्मले आहेत. त्यांचे फोटो, ज्यात ते अगदी कष्टानं हसत असतात आणि त्यांचे भाट (ज्यांचं भाग्य ह्या 'भाग्यविधात्या' च्या दावणीला बांधलेलं असतं) आपली नावं आणि फोटोंच्या रांगेसह त्याच्या चरणाशी रुजू असतात. त्या फलकावर लिहीलेलं पण असतं की लोकप्रिय नेते आणि आमचे भाग्यविधाते श्री. XXX ह्यांना वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा !
आम्हा पामरांना तेव्हा कुठे साक्षात्कार होतो कि हा कोणीतरी नवा भाग्यविधाता आहे बरं !

ह्यांच्या येण्याने कोणती यमुना दुभंगली ?
कोणत्या शिवधनुष्याची प्रत्यंचा मोडली ?
हे कोणासाठी क्रूसवर चढणार आहेत ?
ह्यांच्या वागणुकिने समाजाला सद्वर्तनाची आणि विवेकाची दिशा मिळणार आहे का ?


ह्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहित आणि विचारायला जाणाऱ्याचं 'भाग्य' पुन्हा 'ह्यांच्याच' हाती !
तेव्हा आपल्या आसपास असा कोणी भाग्यविधाता असल्यास तेच सत्य माना.
यापेक्षा फार काही करण्याची कुवत आपल्यात नाही, निदान ज्यांच्यात होती ते आता जन्म घेत नसावेत.

5 Comments:

Blogger Sonali said...

छान लिहीलं आहे. मी जेव्हा असे पोस्टर पाहते, तेव्हा असं वाटतं की कोणी लक्ष देऊन पाहात तरी असेल का हे?

1:34 AM  
Blogger मुकुंद भालेराव said...

This comment has been removed by a blog administrator.

10:12 PM  
Blogger मुकुंद भालेराव said...

This comment has been removed by a blog administrator.

11:27 PM  
Blogger मुकुंद भालेराव said...

नमस्कार मित्रा,

तुझं लिखाण वाचलं. मनापासुन आवडलं. खासकरुन होर्डिंग्ज विषयीचा लेख. झकासच !! तुला हेरंब कुलकर्णी माहित आहेत का?.. सकाळमध्ये ‘ ढिंगटांग ’ शेजारी त्यांच्या वात्रटिका येतात.मला शिकवायला होते काही वर्षं.. त्यांनी काही दिवसांपुर्वी सुरेख लिहिलं होतं या विषयी. तारीख नक्की आठवत नाही. खरंच फार वैताग येतो यार हे भंगार फलक पाहिले की. बरं राजकारणी नेतेमंडळींचं एक वेळ माणुस सहनही करील पण गल्लोगल्ली मंडळांच्या ‘ वांटेड ‘ कार्यकर्त्यांचे चेहेरे त्या फलकांवर पाहिले की गटारात जीव द्यावासा वाटतो. कोणीही सोन्या काटे, गोल्ड्न बढाई, पप्या पाटोळे वगैरे मंडळी आपापल्या बोळात ‘ वर्ल्ड फेमस ‘ होत असतात..

11:38 PM  
Blogger Akira said...

Kharay....

parvachya sakal ka loksattet ek hyach sandarbhaat vinod wachla...It goes something like this...

kuthlyasha rastyawarti mhane asa ek phalak aahe...wishing somebody "happy b'day" and of course w/ pictures of @ least a dozen ppl....now this hoarding has been up fr a yr...when somebody wondered y...a journalist quickly replied that w/ the no. of ppl in the hoarding somebody or the others b'day might be occuring over the yr....so instead of putting up a new one...the same hoaridng can be used fr all ;)....

Oh well...

9:07 PM  

Post a Comment

<< Home