Tuesday, January 03, 2006

भाषा

आजकाल भाषा हा विषय कोणाच्याच जिव्हाळ्याचा राहिलेला नाही. भाषा मग ती बोली असो की लेखी शक्य तितकी ढिसाळ वापरण्याकडे वाढता कल दिसतो. नाही मी साहित्यिक किंवा भाषा शास्त्रज्ञ नाहिये पण भाषेवर अतिशय प्रेम असलेला माणूस आहे. अलंकारीक लिहीणं किंवा बोलणं वेगळं पण नुसतं साधं बोलतांना किंवा लिहीतांना योग्य आणि शुद्ध भाषा वापरणं महत्वाचं आहे. शब्दसंग्रह खूप नसला तरी चालेल पण तो अयोग्य आणि धेडगुजरी नको. दुसऱ्या भाषेचा द्वेष न करता आपली भाषा जपणं महत्वाचं.

1 Comments:

Blogger शैलेश श. खांडेकर said...

आदित्य,

तुम्ही अगदी मनातलं बोललात. आपले स्फुटलेखन नेहेमी वाचावयास मिळो.

7:52 AM  

Post a Comment

<< Home