Saturday, February 04, 2006

रंग दे बसंती

गेले काही दिवस लिहायला सुचलंच नाही, व्यस्त दिनक्रमामुळे जमलं नाही.
नुकताच 'रंग दे बसंती' पाहिला छान आहे खरंच खूप आवडला (नाही त्यावर भाष्य,रसग्रहण इ. करत नाहीये घाबरु नका!)

पण त्यानिमित्ताने काही लिहावसं वाटतयं थोडक्यात.
आपण खरच आपलं स्वातंत्र्य जबाबदारीने सांभाळतोय का ?
का स्वातंत्र्याचं स्वैराचारात रुपांतर झालंय ?
कसल्याच आणि कुठल्याच गोष्टीतून आपला कणा ताठ असल्याचं देश म्हणून काहीतरी एक आवाज असल्याचं कधी दाखवणार नाही आहोत का आपण ?
त्या सिनेमातला मार्ग अवलंबायची आपल्यावर वेळ येवू नये अशी हार्दिक इच्छा.
आपल्या पूर्वजांनी रक्त सांडून त्याग करुन आपल्यासाठी मिळवलेल्या स्वातंत्र्याचा सर्वात मोठा पराभव आपल्याच हातून होतोय ह्या कटू सत्याची जाणीव 'रंग दे बसंती' ने करुन दिली हे मात्र नक्की.

2 Comments:

Blogger Nandan said...

Aditya khare aahe. Nukatech Mid-Day madhe ek cartoon pahile. Two people are leaving the theatre after watching Rang De Basanti. One guy says to another - "We are really forgetting our national heros. I don't remember which was Aamir Khan's first movie." :-)

10:42 PM  
Blogger शंतनू said...

पण शेवट जरा जास्तच टोकाचा आहे. न पटणारा आहे. जो काही लाठीचार्ज केला जातो तसा कश्मिर मध्ये देखील झालेला नाही, गेल्या ५०+ वर्षात. एकदा बघायला चांगला आहे.

4:24 AM  

Post a Comment

<< Home